---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

मोठी बातमी : ॲड.प्रवीण चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । बीएचआर गैरव्यवहारातील संशयिताचा जामिन अर्जाला विरोध न करण्यासाठी १ कोटी २२ लाख रूपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात संशयित असलेले तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण () यांचा मंगळवारी जळगाव जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला आहे.

pravin chauvhan jpg webp

हा खंडणीचा गुन्हा पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात सुरज झंवर यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला होता. मात्र, झंवर यांच्या तक्रारीनुसार घटनाक्रम हा चाळीसगाव शहरातील असल्यामुळे तो गुन्हा चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी जळगाव जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मंगळवारी त्या अर्जावर कामकाज होवून सुनावणीअंती न्यायालयाने चव्हाण यांचा अंतरिम अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. याप्रकरणी सुरज झंवर यांच्याकडून ॲड. सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---