जळगाव शहर

आदित्य ठाकरेंचा जळगाव दौरा तात्पुरता रद्द, काय आहे कारण? घ्या जाणून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । शिवसेना (Shivsena) नेते तथा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा जळगावचा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आजारी असल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला मोठी घरघर लागलीय. अशावेळी राज्यभरातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर येणार होते. तशी घोषणा शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात आली होती. मात्र, आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

या शिवसंवाद दौऱ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button