⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरायची कोठून; वीज ग्राहकांचा सवाल!

अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरायची कोठून; वीज ग्राहकांचा सवाल!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२३ । महावितरणने वीज बिलांसोबत ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिलही दिले आहे. यातून एकट्या भुसावळ तालुक्यातून लाखो रुपये वीज ग्राहकांच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. अगोदरचं महागाईने सामान्य ग्राहक होरपळत आहेत. भरमसाठ वीजबिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच महावितरणने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ‘शॉक’ दिला आहे. त्यामुळे वीज ग्राहक हवालदिल झाले असून ठेवीचे पैसे भरायचे कोठून हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात वीज दर जास्त
देशात दिल्ली सरकारतर्फे वीज ग्राहकांना २०० युनिट वीज मोफत दिली जाते. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ आदी राज्यात ग्राहकांना २ ते २.५० रुपये प्रति युनिट दराने वीज पुरवठा केला जातो. महाराष्ट्रात मात्र १०० युनिटपर्यंत ४.४१ रुपये, १०० ते ३०० युनिट ९.६४ रुपये व ३०१ ते ५०० युनिटपर्यंत १३.६१ रुपये प्रति युनिट दराने विजेचे बिल आकारण्यात येते. या बिलात वीज शुल्क, वीज कर, वीज वाहन कर, इंधन अधिभार आदी शुल्क आकारणी केली जाते. त्यामुळे वीज ग्राहकास ७०० रुपये बिल आले असेल तर ५०० रुपये इतर कर मिळवून १२०० रुपये भरावे लागतात. महावितरण कंपनीतर्फे नवीन संगणकीय मीटर फास्ट असल्यामुळे वीज ग्राहकाने विजेचा वापर कमी केला तरी मीटरमध्ये दुप्पट युनिटचा वापर केल्याचे रीडिंग दर्शविते. त्यामुळे वीज ग्राहकांना वाजवीपेक्षा जास्त वीज बिलाचा भरणा करावा लागतो, अशी ओरड सुरु आहे.

सुरक्षा ठेवीची बिले तत्काळ मागे घ्या
महावितरण कंपनीतर्फे वीज ग्राहकांना एप्रिलच्या वीज बिलासोबत ५० रुपयांपासून तर ५ हजार ते १० हजार रुपये पर्यंतचे सिक्युरिटी डिपॉझीट भरण्याचे वेगळे बिल पाठविल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. संकटकाळात महावितरणने दिलेली अतिरिक्त सुरक्षा ठेवीची बिले ही सामान्य जनतेचा खिसा कापणारी आहेत. ही बिले तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.