Adani Group : प्रचंड चढ-उतारानंतर अदानी समूहासाठी आली गुडन्यूज..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड चढ-उतार होत असताना गौतम अदानी यांना दिलासादायक बातमी मिळाली आहे. म्हणजे अदानी समूहावर फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या ‘शॉर्ट सेलर’च्या अहवालानंतर, समूह कंपन्यांच्या रेटिंगवर आणि त्यांच्या सुरक्षेवर सध्यातरी कोणताही परिणाम होणार नाही, असे फिच रेटिंग्जच्या वतीने आज शुक्रवारी सांगण्यात आले. अमेरिकन आर्थिक संशोधन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहावर ‘ओपन स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड’मध्ये गुंतल्याचा आरोप केला आहे.

रोख प्रवाहावर कोणताही परिणाम नाही
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आठवडाभरापासून झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर रेटिंग एजन्सीचा अहवाल समोर आला आहे. अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ काढून घेतल्यानंतर समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणावर फीचने सातत्याने देखरेख करत असल्याचे सांगितले. रेटिंग एजन्सीने म्हटले की समूहाच्या रोख प्रवाहावर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही वित्त आणि संबंधित क्रियाकलापांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. फिचला अदानी समूहाच्या रोख प्रवाहाच्या अंदाजात कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाही.

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स
अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समधील घसरण आजही थांबली नाही. पण समभागाने पुन्हा एकदा किंचित वाढ नोंदवली. खालच्या स्तरावर अदानी एंटरप्रायझेसचे ३५.१ लाख शेअर्स खरेदी करण्यात आले असून ही ब्लॉक डील ४११.५ कोटींत झाली. आज सकाळी कंपनीचा शेअर ३५ टक्क्यांच्या १,०१७ रुपयांपर्यंत घसरला होता. तर बुधवारी कंपनीच्या व्यवस्थापनाने अदानी एंटरप्रायझेसचे २० हजार कोटी रुपयांचे पूर्ण सबस्क्राईब झालेला एफपीओ काढून घेतला. त्यानंतर समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.