सराफ दुकान फोडणारा अट्टल गुन्हेगार २४ तासाच्या आत जेरबंद

नोव्हेंबर 10, 2022 7:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । सराफ बाजारातील ज्वेलरीचे दुकान फोडणारा अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेचाय पथकाने २४ तासाच्या आत जेरबंद केले. विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे रा. पावर हाउस जवळील भिलवाडी जळगाव, असे आरोपीचे नाव आहे.

jalgaon 2022 11 10T193052.239

सविस्तर असे की, जळगाव शहरातील होणा-या घरफोडी, दुकानफोडी चोरीच्या घटना वाढल्याने घरफोडी चोरी करणारे आरोपीताचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी यांच्या मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळवीली की, शनिपेठ पोस्टे सीसीटीएनएस गुरंन २०२ / २०२२ भा.द.वि कलम ४५७,३८० प्रमाणे सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता.

सदर गुन्हयात सराफ बाजार जळगाव येथिल मनिष ज्वेलर्स याचे दुकान फोडुन सोने चांदीचे दागिणे व रोख रक्कम चोरी झालेले असून ती चोरी जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे रा. पावर हाउस जवळील भिलवाडी जळगाव येथे राहणारा याने त्याचे साथीदारांसह केली आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली. त्यानुसार पोउपनिरीक्षक अमोल देवढे पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, अकरम शेख, अशरफ शेख, रवी नरवाडे, संतोष मायकल, महेश महाजन, सुरज पाटील, अविनाश देवरे, जयंत चौधरी, संदीप सावळे, उमेश गोसावी, राहुल बैसाणे सर्व नेमणुक स्था. गु. शा, अशांना आदेश दिल्याने सदर पथकाने प्रिंप्राळा हुडको येथून ताब्यात घेतले. त्यास व त्याचे रेकॉर्डवरील ०३ अल्पवयीन साथीदार रेकॉर्डवरील निषपण्णकरून आरोपी नामे विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे वय – २७ रा. पावर हाउस जवळील भिलवाडी जळगाव यांस गुन्हयाकामी ताब्यात घेतले आहे सदर गुन्हयामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now