⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगावात दुचाकी चोरट्यांचे रॅकेट सक्रिय? वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । जळगाव शहरात दुचाकी चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढतच आहे. या घटनांवरून दुचाकी चोरट्यांचे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येते. यामुळे दुचाकी वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अशातच शहरातील पिंप्राळा येथील बाजार परिसरातून दुचाकी लांबविल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण दशरथ गवडे (वय-४१) रा. संत निवृत्तीनगर, पिंप्राळा हे आपल्या कुटुंबीय वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार २९ जून रोजी रात्री आठ वाजता सुमारास ते पिंपळा शहरातील बाजार घेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९, सीइ ०७५३) ने बाजार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी बाजार पट्ट्यातील पूजा हॉटेल समोर दुचाकी पार्क केली होती.

बाजार खरेदी केल्यानंतर ते दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी मिळाली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवारी ३० जून रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.