⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई, सहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । शहरात बंदी असलेला गुटखा छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. त्यात रामानंदनगर पोलिसांनी ११ हजार ५०० तर एमआयडीसी पोलिसांनी २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल बँक कॉलनीत हरीश सुभाष सोमाणी व जितेंद्र बापुराव वाणी (दोघे रा. सेंट्रल बँक कॉलनी) हे दोघे गुटखा विक्री करीत होते. पोलिसांनी छापा मारुन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुटखा जप्त केला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुभाष सुरेशचंद्र जैन (वय ३८, रा. सुप्रीम कॉलनी), दीपक जुलाल बेडीसकर (वय ३८, रा. रामेश्वर कॉलनी), कैलास बाबुलाल वंजारी (वय ४७, रा. सुप्रीम कॉलनी) व विलास राजाराम पाटील (वय ५१, रा. सुप्रीम कॉलनी) हे चौघे गुटखा विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा गुटखा जप्त करून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, महेंद्र गायकवाड, मुद्दसर काझी, इम्रान बेग, गोविंदा पाटील, पवन कुमावत, किशोर पाटील, मुकेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे देखील वाचा :