⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई; ६ लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । अवैधरित्या गुटखा व पानमसालाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर जामनेर पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यात तब्बल ६ लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला असून तो हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी येतील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील करमाड येथील पाराचा चौक परिसरात (एमएच १९ सीझेड ५७६८) या वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या तंबाखू व पानमसालाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता धडक कारवाई केली असता (एमएच १९ सीझेड ५७६८) या वाहनातून तब्बल ६ लाख ६३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.