जळगावातील महिलेचा अश्लिल मेसेज पाठवून विनयभंग

नोव्हेंबर 10, 2022 2:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । शहरातील एका परिसरातील २५ वर्षीय विवाहितेला इंस्टाग्रामवर अश्लिल मॅसेज पाठवत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रकरणी एका संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 2022 09 03T132219.635 jpg webp

शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय विवाहितेस सोशल मिडीयावरील इन्स्टाग्राममवरून दि १५ ऑक्टोबरपासून ते ८ नोव्हेबरपर्यंत विवाहितेच्या मोबाईल नंबरवर वारंवार अश्लील मेसेज पाठवत होता. तसेच एकेदिवशी विवाहिता दुकानात वस्तू घेण्यासाठी गेली असता तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी संशयित आरोपी प्रेम नाईक(पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.राजेद्र उगले हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now