लग्नसोहळ्याला गेलेल्या विवाहितेचा विनयभंग

फेब्रुवारी 18, 2022 4:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २३ वर्षीय विवाहितेचा लग्नसोहळ्यात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

women harrasement vinaybhang jpg webp

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ती विवाहिता कुटुंबाला हातभार लावते. गुरूवार १७ फेब्रुवारी रोजी विवाहिता नातेवाईक महिलेसोबत एका लग्न सोहळ्याला गेलेली होती. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गणेश सूर्यवंशी (पूर्ण नाव माहीत नाही) याने महिलेच्या जवळ येवून अंगलट करून करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला.

महिलने रात्री घरी जाऊन घडलेला प्रकार पतीला सांगितला आणि रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश सूर्यवंशी याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now