जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १४ वर्षीय मुलगी एका ओळखीच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अत्याचरातून गर्भवती झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी नातेवाईकांसह वास्तव्यास आहे. दि.५ ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलाने मुलीशी जवळीक साधुन दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. दि.२२ फेब्रुवारीला सकाळी पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागले. तेव्हा पालकांनी तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
पीडीत मुलीला नातेवाईकांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता आपल्यावर परिचयातील मुलाने दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. पीडीत मुलीच्या नातेईकांना पिडीतेसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात जात रात्री तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून संशयितविरुद्ध पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.
हे देखील वाचा :
- पाचोऱ्यात दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह एकाला अटक
- Jalgaon : जळगाव जिल्हा बँकेने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांबाबत घेतला ‘हा’ निर्णय..
- तरुणांनो तयारीला लागा; राज्यात लवकर होणार 10,000 जागांसाठी पोलिस भरती
- Gold Rate: अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना आनंदाची बातमी; सोन्याचा दर घसरला, पहा आताचे भाव
- विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेला अन्.. धरणगावातील दुर्दैवी घटना