---Advertisement---
जळगाव जिल्हा सोने - चांदीचा भाव

Gold Rate: अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना आनंदाची बातमी; सोन्याचा दर घसरला, पहा आताचे भाव

gold silver rate
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२५ । मागील दोन आठवड्यात सोन्या (Gold Rate) सोबतच चांदी (Silver Rate) दरात मोठी वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला. एकीकडे लग्नसराई सुरु असून यातच सोने दराने विक्रमी पातळी गाठल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मात्र घसरण दिसून आली सोबतच चांदीचाही दर घसरला. Gold Silver Rate

gold silver rate

सोन्याचा भाव
सोने 170 रुपयांनी उतरले. मागील दोन आठवड्यात सोने 3000 रुपयांनी महागले. सोन्याने मोठी मजल मारल्याने ग्राहक चिंतेत होता. आता 22 कॅरेट सोने 75,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

---Advertisement---

चांदीचा दर
मागील आठवड्यात चांदी 4 हजार रुपयांनी महागली आणि 2 हजारांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल दिसला नाही. तर 24 जानेवारीला 1 हजार रुपयांनी किंमती वधारल्या. आता 27 जानेवारी रोजी त्यात 1 हजार रुपयांची घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---