---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह एकाला अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुली येथे दोन गावठी कट्टे व चार जीवंत काडतुसांसह एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.अरबाज खान जहुर खान (वय २४ वर्षे), रा. अक्सा नगर, जारगाव ता.पाचोरा) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

crime 2 jpg webp webp

पाचोरा पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, जारगाव चौफुली परिसरात एक इसम गैरकायदेशीर गावठी कट्टे घेऊन फिरत आहे. या माहितीनुसार, पोहेकॉ राहुल शिंपी आणि पोकॉदिनेश पाटील यांनी स्थानिक दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा टाकून कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी जारगाव चौफुली येथील ए वन काटा परिसरात छापा टाकला.

---Advertisement---

यावेळी संशयित अरबाज खान जहुर खान याच्या कंबरेजवळ त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घालत असल्याचे पाहून पो. काॅ. दिनेश पाटील यांनी त्याचे दोन्ही हात दाबून धरले. त्याच्या अंगझडतीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशातून प्रत्येकी २० हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे आणि २ हजार रुपये किंमतीचे चार जीवंत काडतुसे बरोबर सापडले. त्याच्या विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---