---Advertisement---
जळगाव जिल्हा

Jalgaon : जळगाव जिल्हा बँकेने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांबाबत घेतला ‘हा’ निर्णय..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा बँकेने संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बँकेने अशा शेतकऱ्यांना व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज परतफेड केले आहे.

JDCC Bank Jalgaon jpg webp

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन अमोल पाटील, आमदार अनिल पाटील, एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, अॅड. सतीश पाटील, अॅड. रोहिणी खडसे, प्रताप पाटील, श्यामकांत सोनवणे, जयश्री महाजन, प्रदीप देशमुख आणि कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.

---Advertisement---

या बैठकीत लिपिकांच्या २२० जागा भरण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात १७ फेब्रुवारी रोजी विशेष बैठक घेतली जाणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

थकबाकीदार संस्थांच्या मालमत्तेचा लिलाव
जिल्हा बँकेने कर्ज दिलेल्यांपैकी तीन संस्था अशा आहेत की त्यांच्याकडे एक कोटी रुपयापर्यंत कर्ज थकीत आहे. त्याच्या वसुलीसाठी या संस्थांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेला दिल्याची माहिती संजय पवार यांनी दिली. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जास ओटीएसला मुदतवाढ देण्यात आली आहे.

…तर शेतकऱ्यांना कर्ज वाटपात अडचणी
बहुतांश शेतकऱ्यांनी आधारकार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही. केवायसी नसल्याने कर्ज वाटपात अडचणी निर्माण होऊ शकतात. याच बैठकीत नाबार्डच्या अधिकाऱ्यांनीही बँक कशी चालवावी, अडचणी व आव्हाने यावर मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांचे हित पाहता जळगाव जिल्हा बँकेने त्यांच्या पातळीवर व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. हा लाभ ज्यांनी मागील वर्षी तीन लाखाचे कर्ज घेतले व ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाऱ्यांनाच मिळणार आहे. थकबाकीदारांसाठी हा निर्णय लागू होणार नसल्याचे संजय पवार यांनी स्पष्ट केले. मागील वर्षभरात दोन लाख शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---