जळगाव हादरले ! गतिमंद मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती

जानेवारी 14, 2023 1:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका २१ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केलाय. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पीडित मुलगी तीन महिन्याची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 4 jpg webp

नेमकी काय आहे घटना?
पारोळा तालुक्यातील एका भागात राहणारी २१ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई व भाऊसह वास्तव्याला आहे. ती गतिमंद असल्यामुळे ती घरीच असते. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून तिच्यावर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी ती महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती सांगितली.

अल्पवयीन मुलगी ही अविवाहित असून तिचा गतिमंदचा फायदा घेऊन आज्ञात व्यक्तीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडल्यानंतर तिच्या आईने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now