जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । भरधाव स्वीप्टने बुलेटला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमळनेर शहरातील 39 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर सहकारी मित्र जखमी झाला. हा अपघात पाचोरा-जळगाव महामार्गावरील बहुळा धरणाजवळ शनिवारी पहाटे 5.45 वाजेच्या सुमारास घडला. या प्रकणी पोलिसांत नोंद करण्यात आली.
दीपक गंगाराम पाटील (39, आर.के.नगर, अमळनेर) असे मयत युवकाचे नाव आहे. दीपक गंगाराम पाटील हा मित्र रोहित रघुनाथ पाटील (32, आर.के.नगर, अमळनेर) सोबत बुलेट (एम.एच.18 बी.वाय 0031) ने पाचोरा शहराकडून जळगावकडे येत असताना जळगावकडून भरधाव वेगात जाणारी स्विफ्ट डिझायर (एम.एच.06 बी.7527) ने जोरदार धडक दिल्याने दीपक गंगाराम पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर रोहित पाटील हा गंभीर जखमी झाला.
अत्यवस्थ अवस्थेतील दोघांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर डॉक्टरांनी दीपक पाटील यास तपासून मृत घोषित केले तर रोहित रघुनाथ पाटील यास पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद शिंदे हे करीत आहेत.