तारीख पे तारीख : आता दिवाळी नंतरच समजणार शिवसेना कोणाची
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेना कोणाची संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे .कारण नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एक महिन्यानंतर यावर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे समजते आहे.
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कायदेशीर लढाईबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊन निवडणूक आयोगाने यावर निर्णय देण्याची सूचित केले. यानंतर अन्य याचिकांवर सुनावणी घेण्यात आली. यात आता पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या खंडपीठापुढे काल पहिली सुनावणी झाल्यानंतर आता पुढील सुनावणी १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एक महिन्यानंतर यावर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे समजते. मात्र तोवर शिवसेना नेमकी कुणाची याबाबतची संभ्रमावस्था मात्र कायम राहणार हे नक्की.