जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२४ । लोकसभा निवडणुकी चे निकाल जाहीर होण्यापूर्वी शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यानंतर एक्झिट पोल्स समोर आले, तसेच शुक्रवारी जाहीर झालेल्या जीडीपीच्या आकडेवारीनंतर पुन्हा एकदा एनडीएच सरकार सत्तेत येईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारातील कामकाज जबरदस्त तेजीने सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. याची सुरुवात झाली ती म्हणजे बंपर उसळीने.
ट्रेडिंगच्या सुरुवातीला सेनेक्स आणि निफ्टीने आत्तापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडून काढले. सेनेक्स २६२१ अंकांच्या वाढीसह ७६५८३ च्या पातळीवर उघडला असून सेनेक्स मधील सर्वच शेअर्स ग्रीन झोन मध्ये होते. तर निफ्टी ८०७ अंकांच्या वाढीसह २३३३७ वर उघडला.
अशाप्रकारे एक्झिट पोलच्या अंदाजाने शेअर बाजार देखील ऐतिहासिक शिखरावर पोहोचले.
आजचे टॉप १० शेअर्स
१) अदानी इंटरप्रायझेस ( ADANIENT)
२) अदानी पोर्ट्स ( ADANIPORTS)
३)कोल इंडिया (COALINDIA)
४)श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)
५)टाटा स्टील ( TATASTEEL)
६)आयडिया (IDEA)
७)एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी ( HDFCAMC)
८)गोदरेज प्रॉपर्टीज ( GODREJPROP)
९)अशोक लेलँड ( ASHOKLEY)
१०)लुपिन लिमिटेड ( LUPIN)