जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दोन मोठ्या बँकांवर कारवाई केली असून या कारवाई मागील धक्कादायक कारण देखील समोर आलंय. आरबीआयने येस बँक(YES) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेला नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे.
आरबीआयने येस बँकेला 91 लाख तर आयसीआयसीआय बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.या दोन्ही बँका काही मार्गदर्शक तत्वांचं पालन करत नव्हत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. आरबीआयच्या माहितीनुसार येस बँकेला ग्राहक सेवा आणि अतंर्गत कार्यालयीन खात्यांशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला. येस बँकेने झिरो बॅलन्स खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक नसल्याचे कारण देत शुल्क वसूल केले होते.
कारवाईमागील कारण समोर
इतकंच नाही तर, बँकेने फंड पार्किंग आणि ग्राहक व्यवहारांना रुट करण्यासारख्या चुकीच्या कारणांसाठी ग्राहकांच्या नावावर काही अतर्गंत खाती उघडली आणि चालवली होती. 2022 मध्ये या चुका पुन्हा-पुन्हा करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे आरबीआयने कारवाई केली.
तर, आयसीआयसीआय बँकेने अपुऱ्या चौकशीच्या आधारे काही प्रकरणांमध्ये कर्ज दिली. यामुळे बँकेला वित्तीय संकटाचा सामना करावा लागला. आरबीआयला (RBI Action)चौकशीमध्ये आयसीआयसी बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेत काही चुका आढळून आल्या होत्या. यामुळे दोन्ही बँकांना आर्थिक दंड दिला गेला.