⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | बातम्या | मान्सूनची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याकडून महत्वाची अपडेट समोर

मान्सूनची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याकडून महत्वाची अपडेट समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । सध्या देशासह राज्यातील अनेक भागात सूर्य आग ओकत असून प्रचंड उष्णता जाणवत आहे. उष्णतेने होरपळून निघणाऱ्या जनतेला आता मान्सूनच्या पावसाचे वेध लागले आहे. अशातच मान्सूनच्या आगमानची चातकासारखी वाट पहात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. आयएमडीने १९ मे ही तारीख अंदमानमधील मान्सूनच्या आगमानाची दिली गेली होती. त्यानुसार अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. यांनतर आता त्याची वाटचाल केरळकडे सुरु होणार आहे. अंदमानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंत पोहचण्यासाठी दहा दिवस लागतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर ३१ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे.

महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
सध्या राज्यातील जळगावसह काही ठिकाण तापमान वाढीने कहर केला. उष्णतेच्या लाटेत नागरिक होरपळून निघत असून मान्सून कधी दाखल याची प्रतीक्षा आहे. अशात मान्सून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार आहे. दरम्यान, मान्सूनपूर्वी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.