⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

दोन दिवसात सोने 1150 रुपयाने महागले ; आता जळगावात 10 ग्रॅमचा भाव किती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२४ । सोन्याच्या दराने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीही महागली आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत ११५० रुपयाची वाढ झालेली दिसून आली. तर चांदी ५०० रुपयांनी वाढली. Gold Silver Rate 3 March 2024

या आठवड्याच्या सोमवारी (२६ फेब्रुवारी) सकाळच्या सत्रात जळगावमधील सुवर्णनगरीत सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६२,५०० रुपयावर होता. तर चांदीचा एक किलोचा दर ७१,५०० रुपयांवर होता. मात्र या आठवड्याच्या शेवटच्या दोन सत्रात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली

आज सकाळी सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ६३,७५० रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी गुरुवारी सायंकाळच्या सत्रात सोन्याचा दर ६२,६०० रुपयांवर होता. मात्र, शुक्रवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५०० रुपयांनी वाढून ६३,१०० रुपयांवर पोहोचला, शनिवारी त्यात पुन्हा वाढ दिसून आली. शनिवारी सोन्याचा प्रति तोळ्याच्या दरात ६५० रुपयाची वाढ दिसून आली. दोन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ११५० रुपयाची वाढ झाली.

दुसरीकडे या आठवड्यात चांदी ५०० रुपयांनी महागली. सध्या चांदीचा एक किलोचा दर ७२००० रुपयांवर आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (२६ फेब्रुवारी) चांदीचा दर ७१५०० रुपयांवर होता. दरम्यान, चालू आर्थिक वर्षातील अखेरच्या महिन्यात, मार्चमध्ये सोने-चांदी महागण्याची शक्यता आहे.