‘या’ आठवड्यात सोने महागले, चांदी घसरली ; तपासून घ्या जळगावातील नवे दर

फेब्रुवारी 25, 2024 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । 25 फेब्रुवारी 2024 । या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली तर चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. आठवड्याभरात सोने 200 रुपयांनी वधारले आहे. तर चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली Gold Silver Rate 25 February 2024

gold silver 2 jpg webp

जळगाव सराफ बाजरात या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 72000 रुपयांवर होता. तर सोन्याचा दर 62,400 रुपयांवर होता. मात्र त्याच दिवशी सोने 100 रुपयाने तर चांदी 500 रुपयांची वाढ झाली. मंगळवार आणि बुधवारी चांदीच्या दरात प्रत्येकी 500 रुपयाची वाढ झाल्यामुळे बुधवारी सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 73000 रुपयावर गेला होता. मात्र सलग तीन सत्रात चांदी दरात घसरण दिसून आली.

जळगावात सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 71500 रुपयावर आहे. एकंदरीत या आठवड्यात चांदी दरात 500 रुपयाची घसरण दिसून आली तर दुसरीकडे सोन्याच्या दरात मात्र 200 रुपयाची वाढ दिसून आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now