⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | राजकारण | भाजप प्रवेशाच्या चर्चेला एकनाथ खडसेंकडून पूर्णविराम ; म्हणाले मी..

भाजप प्रवेशाच्या चर्चेला एकनाथ खडसेंकडून पूर्णविराम ; म्हणाले मी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२४ । ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजिक कार्यक्रमांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांसमोर आलेले नसून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याच दरम्यान एकनाथ खडसेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ट्विट करून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?
भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा माझ्याबाबत संभ्रम निर्माण व्हाव्या म्हणून पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करावे. असे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशावर राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना याचे सूतोवाच केले होते. एकनाथ खडसे हे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली होती. यामुळे नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाची चर्चा वेगाने सुरू होती.मात्र आता खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.