⁠ 
शुक्रवार, जानेवारी 3, 2025
Home | जळगाव जिल्हा | सकारात्मक मानसिकता यशस्वी START UP ची गुरुकिल्ली ; डॉ. युवराज परदेशी

सकारात्मक मानसिकता यशस्वी START UP ची गुरुकिल्ली ; डॉ. युवराज परदेशी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बोदवड महाविद्यालयात उद्योगांकडून स्वावलंबनाकडे वाटचाल या कार्यशाळेला उत्स्फूत प्रतिसाद

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२४ । कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे आज शनिवार आयोजित उद्योगाकडून स्वावलंबनाकडे वाटचाल या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूत प्रतिसाद लाभला. सदर कार्यशाळाचे आयोजन महाविद्यालयातील CIIL व IQAC कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन जळगाव येथील content ocean private limited चे संचालक व सह संस्थापक युवराज परदेशी यांच्या हस्ते प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

याप्रसंगी प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी विदयार्थ्यांना स्टार्ट अप इंडिया या उपक्रमाचे फायदे समजाऊन संगतांना अधिकाधिक नावीन्यपूर्ण उद्योगांचे महत्त्व सांगीतले. इच्छाशक्ती , प्रयत्न व मेहनतीची जोड आणि सोबत योग्य मार्गदर्शन असेल तर युवकांच्या संकल्पनेला चालना मिळेल आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल असे सांगीतले.

यावेळी नवयुवकांना यू ट्यूब व रेडिओ द्वारे सतत स्टार्टअप बद्दल मार्गदर्शन करणारे डॉ.युवराज परदेशी यांनी Start up, Unicorn म्हणजे काय, सुरुवात कशी करता येइल, तसेच swiggy, zomato व आपल्या आजूबाजूच्या लोकांचे उदाहरण देऊन त्यांनी विदयार्थ्यांना छोट्या छोट्या उद्योगांची कशी सुरुवात करता येऊ शकते याबद्दल अतिशय सोप्या शब्दात माहिती दिली. आपल्या आजूबाजूला डोळसपणे बघितल्यावर लोकांच्या गरजेतून जेव्हा नवीन कल्पना येतात, त्यातून बाजारपेठ कशी काबीज करता येईल, आपली कंपनी कशी मोठी होईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. गरज निर्माण झाली तरच समाधानासाठी नविन संकल्पना जन्माला येते. त्याचा पाठपुरावा करून उपाय निघतो आणि त्यातूनच एक नवनिर्मिती होऊन ती स्वतःच्या व इतरांच्या कशी उपयोगी पडते याचे अनेक उदाहरणं देखील त्यांनी दिले. तसेच पूर्वतयारी, संशोधन आणि व्यवसायात भागीदार निवडण्याचे निकष, भांडवल कसे, कुठे व किती मिळवता येइल, यात महाविद्यालयातील व विद्यापीठातील incubation centre ची कशी मदत घेता येईल, अशा अनेक गोष्टींचा त्यांनी उहापोह केला. सकारात्मक मानसिकता कशी महत्त्वाचीआहे हे सांगून त्यांनी विदयार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.

कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. गीता पाटील यांनी केले व आभार डॉ. नरेन्द्र जोशी यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती कंचन दमाडे यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उप प्राचार्य डॉ. विनोद चौधरी, डॉ. रत्ना जवरास, डॉ. चेतनकुमार शर्मा, नितेश सावदेकर, डॉ. ईश्वर म्हसलेकर, युवराज आठवले, अमर वाघमोडे, अनिल धनगर, शरद पाटील, अजित पाटील राजू मोपारी, जितेंद्र बडगुजर, अतुल पाटील, समीर पाटील यांनी सहकार्य केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.