जळगाव लाईव्ह न्यूज । 7 फेब्रुवारी 2024 । राष्ट्रवादी कुणाची? याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला असून त्यानुसार राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिला आहे. यांनतर अजित पवार गटाच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला.
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात अजित पवार गट आनंद साजरा करत असताना याच चौकात दुसऱ्या ठिकाणी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 18 पदाधिकाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
अजित पवार यांच्याविरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 18 जणांविरुद्ध अजित पवार गटाच्या वतीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्य भाषेत घोषणाबाजी करणाऱ्या शरद पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे रामानंद पोलीस ठाण्यात एकत्र आले व शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर तक्रार दिली.
यापुढे अजित पवार यांच्याविरुद्ध एकही अपशब्द सहन केला जाणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.