जळगाव लाईव्ह न्यूज | 30 जानेवारी 2024 | धान्य बाजारात हरभरा, तुरीची आवक वाढली असली तरी अजून गव्हाची आवक सुरू झालेली नाही. मात्र, बाजारात गव्हाची मागणी वाढल्याने गव्हाचे दर गेल्या महिन्याच्या दराच्या तुलनेत वाढलेले आहेत.
धान्य बाजारात सद्य:स्थितीत गव्हाचे भाव ३२०० ते ३६०० रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. नवीन गव्हाची आवक जिल्ह्यात सुरू झालेली नाही. आगामी महिना- दीड महिन्यात नवीन गव्हाची आवक बाजारात होणार आहे. गेल्या महिन्यात गव्हाचे दर ३ हजार ते ३४०० रुपयांपर्यंत होते. मात्र, आता त्यात वाढ झाली आहे. पुढील महिन्यात गव्हाची आवक सुरू होईल. त्यामुळे गव्हाच्या मागणीतदेखील वाढ होऊ शकते
यंदा गव्हाचा पेरा घटला!
यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 3 कमी पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्या प्रमाणात गव्हाची लागवड होते.त्या तुलनेत यंदा जिल्ह्यात गव्हाची लागवड झालेली नाही. जिल्ह्यात दरवर्षी ६१ ते ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड होत असते. मात्र, यंदा ४८ हजार हेक्टर ३ क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली आहे. गव्हाच्या तुलनेत हरभरा व तेलबियांच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे.