जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२४ । अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक दिनी म्हणजेच 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्धा दिवस सुट्टी असेल याबाबत आदेश नुकतेच केंद्र सरकारने जारी केला आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या प्रचंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. राममंदिराच्या अभिषेक निमित्त भारतभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमध्ये 22 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी असेल. लोकांना प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी असे केले जात आहे.
मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीबाबत पंतप्रधान मोदींनी सर्व मंत्र्यांकडून अभिप्राय घेतला आहे. मंत्र्यांना 22 जानेवारी दिवस दिवाळी सारखा साजरी करण्यास सांगितले आहे. त्यांना 22 जानेवारी रोजी घरांमध्ये दिवे लावायला आणि गरिबांना अन्नदान करण्यास सांगितले आहे. 22 जानेवारीनंतर त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील लोकांना ट्रेनमधून अयोध्येला पाठवावे, असेही म्हटले आहे.
अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा अभिषेक होणार आहे. यापूर्वी अयोध्या राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी राम मंदिराचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले होते. रामललाच्या मंदिरात गर्भगृह असेल, येथे पाच मंडप असतील. मंदिर तळमजल्यावर असेल. मंदिराचे काम पूर्ण झाले आहे.
मात्र, मंदिराच्या पहिल्या मजल्यावर अजून काही काम बाकी असल्याचे त्यांनी सांगितले होते. येथे राम दरबार होणार आहे. मंदिराचा दुसरा मजला धार्मिक विधींसाठी आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ आणि विधी होणार आहेत. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता शुभ मुहूर्त असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी पूजाविधी सुरू करण्यात आला असून, उद्या रामललाची गर्भगृहात प्रतिष्ठापना केली जाईल.