⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | प्रवाशांनो लक्ष्य द्या : रेल्वेकडून ‘या’ 15 रेल्वे गाड्या रद्द

प्रवाशांनो लक्ष्य द्या : रेल्वेकडून ‘या’ 15 रेल्वे गाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । पश्चिम बंगालमध्ये येणार्‍या ‘यास’ चक्रीवादळ आगमनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने 15 रेल्वे गाड्यांसह चार पार्सल रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या गाड्या झाल्या रद्द

गाडी क्रमांक 02279 पुणे-हावडा विशेष गाडी 24 व 25 रोजी सुटणारी व गाडी क्रमांक 02280 हावडा-पुणे विशेष गाडी 25 व 26 रोजी सुटणारी,  गाडी क्रमांक 02833 अहमदाबाद-हावडा विशेष गाडी 25 व 29 रोजी सुटणारी तसेच गाडी क्रमांक 02834  हावडा-अहमदाबाद विशेष गाडी 25 व 26 रोजी सुटणारी, गाडी क्रमांक 02809 मुंबई-हावडा विशेष गाडी 24 व 28 रोजी सुटणारी व गाडी क्रमांक 02810 हावडा-मुंबई विशेष गाडी 25 व 26 रोजी सुटणारी, गाडी क्रमांक 02259 मुंबई-हावडा विशेष गाडी 25 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 02260 हावडा-मुंबई विशेष गाडी 26 रोजी सुटणारी, गाडी क्रमांक 02905 ओखा-हावडा विशेष गाडी 30 रोजी सुटणारी व गाडी क्रमांक 02906 हावडा-ओखा विशेष गाडी 25 रोजी सुटणारी, गाडी क्रमांक 02255 लोकमान्य-टिळक टर्मिनस कामाख्या विशेष गाडी 30 रोजी सुटणारी, गाडी क्रमांक 02809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा विशेष गाडी 25 रोजी सुटणारी व गाडी क्रमांक 02810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष गाडी 27 रोजी सुटणारी, गाडी क्रमांक 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा विशेष गाडी 25 रोजी सुटणारी व गाडी क्रमांक 02102 हावडा लोकमान्य टिळक टर्मिनस 27 मे रोजी सुटणारी गाडी रद्द करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

या पार्सल गाड्या झाल्या रद्द

00113 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-शालिमार पीसीईटी  24 व 27 मे रोजी सुटणारी व 00114 शालिमार-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पीसीईटी 25 व 26 मे रोजी सुटणारी, 00123 सांगोला- शालिमार पीसीईटी 25 व 00124 शालिमार-सांगोला पीसीईटी  27 मे रोजी सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.