जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२४ । येत्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाकडून एका जिल्ह्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश पोलीस दलाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३ पोलीस निरीक्षकांसह २७ सहाय्यक पोलीस निरीक्षक व २३ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. जे अधिकारी मूळ जिल्ह्यात सेवा बजावित असून ते बदलीस पात्र आहेत.

जिल्ह्यातील जे अधिकारी बदली पात्र असून त्यांची बदली नाशिक परिक्षेत्रातंर्गतच होणार आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मूळ रहिवासी असलेल्या ठिकाणी सेवा बजावली आहे त्यांची मुख्यत्वे बदली होणार आहे. बदलीपात्र अधिकाऱ्यांना परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये बदली होवून जावे लागणार आहे. अधिकाऱ्यांकडून मागविले तीन पसंतीक्रम जिल्हा पोलिस दलाने बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. बदली होणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून तीन पसंती क्रमांक मागवले आहेत. तसे पत्र प्रभारी पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी काढले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पसंती क्रमांक दिला नाही, त्यांची माहिती निरंक समजण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.
या अधिकाऱ्यांची होणार बदली !
एमआयडीसी पो.नि. जयपाल हिरे, रामानंद नगर पो. नि. शिल्पा पाटील, चोपडा शहर पो.नि. कांतीलाल पाटील, भडगाव पो.नि. राजेंद्र पाटील, नियंत्रण कक्षातील पो.नि. अरुण धनवडे, रामकृष्ण कुंभार, चाळीसगाव पो.नि. ज्ञानेश्वर जाधव, पाचोरा पो.नि. राहुल खताळ, जिल्हा विशेष शाखा विलास शेंडे, पारोळा पो.नि. सुनिल पवार, पहुर पो.नि. सचिन सानप यांच्यासह निलंबीत असलेले किरणकुमार बकाले व राहुल गायकवाड यांची देखील बदली होणार आहे.