⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | पेट्रोलपंपावर सकाळपासूनच ‘नो स्टॉक’चे बोर्ड : पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ

पेट्रोलपंपावर सकाळपासूनच ‘नो स्टॉक’चे बोर्ड : पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२३। एकीकडे नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं असताना दुसरीकडे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामागील कारण म्हणजे केंद्र सरकारने आणलेल्या मोटार वाहन कायाद्याच्या विरोधात देशभरातील ट्रॅक टँकर चालक रस्त्यावर उतरले आहे. देशातील ट्रॅकरचालकांनी संप पुकारला असून यामुळे मालवाहतूक सह इंधन वाहतूक ठप्प झाली आहे.

इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी संप पुकारल्याची बातमी कळताच जळगावसह राज्यातील अनेक पेट्रोलपंपावर वाहनचालकांनी सोमवारी रात्री मोठी गर्दी केली होती. पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली.

काही पंपांवर किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. पेट्रोल मिळेल की नाही या धास्तीने अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल करून घेतल्या.जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर सकाळपासूनच ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले आहेत.

दरम्यान, इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी संप पुकारल्यामुळे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, अकोला, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांना पानेवाडीतून इंधन पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे इंधनटंचाईचं संकट निर्माण झालं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.