जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार जळगाव शहरात ११ ते १५ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
जळगाव शहर महापालिका हद्दीत दिनांक ११ मार्च २०२१ रात्री ८ वाजेपासून दिनांक १५ मार्च २०२१ सकाळी ८ वाजेपर्यन्त हा जनता कर्फ्यू लागू असेल. या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘एमपीएससी’च्या परीक्षा आहेत. त्यामुळे ती परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांना यातून सूट देणार आली आहे. परंतु त्यांना आपले आयकार्ड आणि हॉल तिकीट जवळ ठेवणे आवश्यक आहे.
जळगाव शहर मनपा हद्दीत काय सुरू राहणार याचा तपशील खालील प्रमाणे:
1) रेल्वे, बस, विमानसेवा
२) टक्सी, कब, रिक्षा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरिता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना
३) जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक रिक्षा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा करतात तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचाऱ्यांची वाहने व परीक्षेला जाणारे विद्यार्थ्यांसाठी
४) चार चाकी वाहने केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवे करतात तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचाऱ्यांची वाहने परीक्षेला जाणारे विद्यार्थ्यांसाठी केवळ वन प्लस टू
५) दुचाकी वाहने केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचारी यांची वाहने व परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (केवळ १+१)
६) मेडिकल स्टोअर्स
७) हॉस्पिटल्स/OPD/IPD/Medical Para, मेडिकल स्टाफ मेडिकल व वाहतूक ऍम्बुलन्स सेवा
८) दूध खरेदी विक्री केंद्र
९) कृषी संबंधित कामे
१०) औद्योगीक आस्थापने
११) जेथे पूर्वनियोजित परीक्षा आहे अशा शाळा महाविद्यालय
१२) कृषी सेवा केंद्रे पशुखाद्य केंद्रे पशुवैद्यकीय सेवा
१३) शासकीय कार्यालय (50% उपस्थित)
१४) बँका व वित्तीय संस्था पोस्टल सेवा
१५) पेट्रोल पंप सेवाची वाहने ऑटोरिक्षा तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचाऱ्यांची वाहने, परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची वाहने
१६) कुरियर
१७) गॅरेज वर्कशॉप्स
१८) सर्व प्रकारचे मालवाहतूक
१९) वृत्तपत्र मीडिया सेवा
२०) कोविड- १९ लसीकरण कार्यक्रम
जळगाव शहर मनपा हद्दीत काय बंद राहतील याचा तपशील खालील प्रमाणे:
१) शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय विद्यापीठ
२) हॉटेल रेस्टॉरंट होम डिलीवरी पार्सल वगळता
३) किरकोळ भाजीपाला
४) धार्मिक स्थळे सभा बैठका
५) शासकीय खाजगी बांधकामे (मान्सूनपूर्व कामे वगळून)
६) शॉपिंग मॉल्स मार्केट
७) सलून
८) खाजगी कार्यालय
९) गार्डन पार्क बगीचे
१०) सिनेमागृहे नाट्यगृहे
११) व्यायामशाळा जलतरण तलाव
१२) क्रीडा स्पर्धा
१३) पानटपरी हात गाड्या उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री
१४) प्रदर्शने मेळावे संमेलने
१५) आठवडी बाजार
१६) सांस्कृतिक धार्मिक व तत्सम कार्यक्रम
१७) किराणा दुकाने नोन इसेन्शियल इतर सर्व दुकाने
हे देखील वाचा : बिग ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू