गुन्हेजळगाव जिल्हा

पाकिस्तानातील हस्तकाला गोपनीय माहिती दिली ; जळगावच्या तरुणाला एटीएसने ठोकल्या बेड्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२३ । पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवण्याच्या आरोपावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जळगावातील रहिवाशी असलेल्या संशयित तरुणाला ठाण्यातून अटक केली.

गौरव पाटील (२३) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे; तो मूळ जळगाव येथील असून त्याने मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले होते. नौदलात काम करतांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.

एप्रिल-मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सऍप वर तो संपर्कात होता. एटीएसने चौकशी केल्यानंतर चौघांना अटक केली आहे. गौरव पाटील याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला हनी ट्रॅप अडकवल्याचा संशय आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, गौरव पाटील हा मूळचा जळगाव येथील रहिवासी असून त्याची चौकशी करण्यासाठी एटीएसचे पथक जळगावात आले होते. या पथकाने काही महत्वाची माहिती जमा केली असून याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. तर, गौरव पाटील याला जेरबंद करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button