⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | विजयवाडा-जयपूर एकेरी विशेष रेल्वे धावणार ; या स्थानकांवर असेल थांबा

विजयवाडा-जयपूर एकेरी विशेष रेल्वे धावणार ; या स्थानकांवर असेल थांबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२३ । दक्षिण मध्य रेल्वेने विजयवाडा ते जयपूर अशी एकेरी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे गुरुवार, १४ डिसेंबर रोजी सोडण्यात येणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०७५९७ विजयवाडा-जयपूर एकेरी विशेष रेल्वे गुरुवार, १४ डिसेंबर रोजी विजयवाडा येथून १४.०५ वाजता सुटेल व दिनांक १६.१२.२०२३ रोजी जयपूरला ०५.२५ वाजता पोहचेल. या विशेष रेल्वेला एसी ३ टियर इकॉनॉमी, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. विजयवाडा ते जयपूर या विशेष रेल्वेचे सिकंदराबाद ते जयपूर पर्यंतचे वेळापत्रक हैदराबाद-जयपुर साप्ताहिक एक्स्प्रेस प्रमाणे आहे.

या स्थानकांवर असेल थांबा
मार्गात ही विशेष गाडी गुंटूर, सत्तेनापल्ली, पिदुगुरल्ला, नाडीकुडे, मिर्यालागुडा, नलगोंडा, सिकंदराबाद, कामरेड्डी, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौड़गड, भिलवाडा, बिजाईनगर, अजमेर, किशनगड आणि फुलेरा स्टेशनवर थांबेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.