प्रदीप मिश्रांच्या कथेत चोरट्यांचा धुमाकूळ ; आणखी 10 जणांच्या टोळीला अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । बडे जटाधारी श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेच्या स्थळावरून एलसीबीच्या पथकाने पुन्हा चोरी करणाऱ्या १० जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळीतील सदस्य मध्यप्रदेशसह राजस्थान येथील असून त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून आज कथेचा चौथा दिवस आहेत. कथेच्या पहिल्या दिवशी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागीने तसेच पैशांची पाकीट व मौल्यवान वस्तू चोरण्याचा प्रकार उघडकी आला होता. याबाबत तब्बल २७ महिलांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या महिला मध्यप्रदेशातील असून त्यांची टोळीच असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी २७ महिलांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या पोलीस कोठडीत आहेत.
यानंतर आता पुन्हा कथेच्या ठिकाणाहून राजस्थान व मध्यप्रदेशातील दहा जणांची टोळी जेरबंद करण्यात आली असून या आता एकूण संशयितांची संख्या ही ३७ इतकी झाली आहे. कथेच्या पहिल्याची दिवशी पकडलेल्या २७ जणांच्या टोळी ही मध्यप्रदेशातील धडेली हाडी पिंप्री, बरडीया, हिंगोलीया, धडेली चारभूजा, हाडी पिपल्या, बरखेडा या गावातील होती. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने १० महिलांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यातील पाच महिला या राजस्थानमधील अलवर, भरतपुर, सदनपुरी याठिकाणारील तर पाच संशयित महिला या इंदौर येथील असून त्या देखील एकमेकांच्या नातलग असून एक संशयीत इलाहाबाद येथील असल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे.