जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांवर स्थानबद्धतेसह जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्याचे सत्र सुरु आहे. अशातच गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांना आज गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत बुधवारी आदेश काढण्यात आले आहे.
आकाश अरुण दहेकर (रा. जाखनीनगर, कंजरवाडा), पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा ठाकूर (रा. तुकारामवाडी), रोहित उत्तम भालेराव (रा. कासमवाडी), रोशन उर्फ बबलू हिलाल धनगर, रा. सम्राट कॉलनी), खुशाल उर्फ काल्या बाळू मराठे (रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी), मायकल उर्फ कन्हैया नेतलेकर (रा. संजय गांधीनगर, कंजरवाडा), बिजासन फकिरा घुगे (रा. मेहरुण तांबापुरा), सनी उर्फ सुनील महादू सोनवणे (रा. तांबापुरा), लोकेश चंद्रकांत दंडगव्हाळ (रा. अयोध्यानगर), विजय गुलाब मराठे (रा. सुप्रीम कॉलनी), कृष्णा रघुनाथ भालेराव (रा. कुसुंबा), अजय विजय भिल (रा. शिरसोली) यांच्याविरुद्ध २८ सप्टेंबर रोजी मनाई आदेश काढण्यात आला आहे.