जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाच्या काही पिकांना फटका बसला आहे. यामुळे डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामातील मुगाला आणि उडीदला चांगला दर मिळाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत जाहीर लिलावात मुगाला १० हजार तर उडीदाला ८ हजार ६३० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. समितीच्या मुख्य यार्डात बुधवारी नवीन हंगामातील उडीद व मूग या शेतमालाच्या जाहीर लिलावास सुरुवात झाली. जितेश ट्रेडर्स यांच्या फर्मवर उडदाचा जाहीर लिलाव घेण्यात आला.
या लिलावात बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे, संचालक दिलीप कोळी, मनोज चौधरी, गोकुळ चव्हाण, पंकज महाजन, अशोक राठी उपस्थित होते. शेतमाल विक्रीसाठी वाळवून व चाळणी करून आणावा. लिलावात चढाओढीद्वारे जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून घेण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.