गुन्हेजळगाव जिल्हा

श्रावण संपता-संपता 9 बकऱ्यांसह 11 बोकड लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या असून चोरट्यांना पोलिसांचा धाकच संपला असल्याचे दिसून येतेय. अशातच श्रावण महिना संपायला दोन दिवस शिल्लक असतानाच गोठ्यात बांधलेल्या ९ बकऱ्यांसह ११ बोकड चोरट्यांनी रात्रीतून चोरुन नेले. हा प्रकार जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रावण मासात मटण-मासे खाणे बंद असताना उपलब्धतेनुसार दरही नियंत्रणात होते. मात्र, श्रावण संपत आला असताना चिकन, मटण आदींच्या मागणीत वाढ होत आहे. परिणामी, गाव-खेड्यांतील पशुधन चोरीला जावु लागले आहे.नांद्रा बुद्रुक गावात चांदसर रस्त्यावर विजय श्रावण बाविस्कर व रवींद्र प्रकाश वाघ या पशुपालकांचा गोट फार्मवजा गोठा आहे. शनिवारी (ता. ९) रात्री आठला त्यांनी आपल्या बकऱ्या व बोकड गोठ्यात बांधले होते.

त्यानंतर ते घरी आले. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १०) सकाळी सातच्या सुमारास चोरट्याने नऊ बकऱ्या व ११ बोकड असे तब्बल लाख रुपयांचे पशुधन चोरुन नेल्याचे आढळून आले. त्यांनी सर्वत्र विचारपुस व शोध घेतला; परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर बाविस्कर यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक ईश्‍वर लोखंडे तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button