⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | विशेष | शरद पवार, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पाचोऱ्यात प्रतिउत्तर देणार का ?

शरद पवार, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पाचोऱ्यात प्रतिउत्तर देणार का ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ सप्टेंबर २०२३ | वारंवार पुढे ढकलण्यात येणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचोरा दौरा १२ सप्टेंबर रोजी निश्चित झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पाचोरा येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे, डॉ. तानाजी सावंत यांच्यासह १२ कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याची राजकीय व प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानिमित्त नांद्रा (ता. पाचोरा) येथील नर्मदा ॲग्रो या कृषीविषयक प्रकल्पाचे उद्‌घाटन, नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, ऑक्सिजन पार्क यासह विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन केले जाईल. हा प्रशासकीय कार्यक्रम असला तरी यात राजकीय फटकेबाजी होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा जिल्ह्यात झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती, त्यास मुख्यमंत्री कसे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर महविकास आघाडी व सत्ताधारी महायुती आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांचा धडका सुरू आहे. उद्धव ठाकरेंची सभा झाली की तेथे एकनाथ शिंदे तर शरद पवारांना अजित पवार प्रत्युत्तर सभा होत आहेत. काही ठिकाणी शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे संयुक्तपणे विरोधकांचा समाचार घेतांना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या जोरदार सभा झाल्या आहेत. या सभांना सत्ताधारी कसे प्रत्युत्तर देणार, याकडे लक्ष आहे.

असे आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा

  • मंगळवार, 12 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 12 वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर आगमन व तेथून हेलिकॉप्टरने हडसन शिवार हेलीपॅड, ता.पाचोरा, जि.जळगावकडे प्रयाण,
  • दुपारी 12.15 वाजता मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा शहराकडे प्रयाण,
  • दुपारी 12.30 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- एम.एम.कॉलेज मैदान, पाचोरा),
  • दुपारी 2.30 वातता मोटारीने मौजे नांद्रा, ता.पाचोरा शहराकडे प्रयाण,
  • दुपारी 2.50 वाता नर्मदा ग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव, जि.जळगाव व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भूमिपूजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि.जळगाव),
  • दुपारी 3.30 वाजता मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण,
  • दुपारी 3.45 वाजता मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, दुपारी चार वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
author avatar
टीम जळगाव लाईव्ह