ग्राहकांना सुवर्णसंधी..!! चांदीच्या दरात 3640 रुपयांची घसरण, सोनेही घसरले

सप्टेंबर 10, 2023 2:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२३ । लग्नसराईनंतर सणांमध्ये लोक सहसा सोने चांदी (Gold Silver Rate) खरेदी करतात. कोरोना लॉकडाऊन आणि त्यानंतर जगातील घडामोडीमुळे सोन्यासह चांदीच्या किमतीवर मोठा बदल झालेला दिसून आला. दोन्ही धातूंनी नवनवीन रेकॉर्ड केले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. मात्र त्यानंतरही दोन्ही धातूंचे दर म्हणावे तेवढे घसरलेले नाहीय. गेल्या आठवड्यात सोने चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून आली होती. मात्र या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये घसरण झालेली पाहायला मिळतेय. चांदीच्या किमतीत तब्बल 3 हजार रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे.

gold jpg webp

भारतीय सराफा बाजारात या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असून या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. भारतीय सराफा बाजारात सोमवारी २२ कॅरेट सोन्याचा भाव 54,743 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा त्याची किंमत 54,143 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. म्हणजेच या आठवड्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 550 रुपयांनी घसरला.

24 कॅरेट सोन्याचा भाव आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार, 4 सप्टेंबर रोजी 59,720 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो शुक्रवारी 59,120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला. म्हणजेच या आठवड्यात 24 कॅरेट सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

तर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवसाच्या सुरुवातीला चांदीचा भाव 75,090 रुपये प्रति किलो होता. जो आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी 71,450 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. म्हणजेच या आठवड्यात चांदीच्या दरात प्रति किलो 3640 रुपयांची घसरण नोंदवली गेली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now