गुन्हेजळगाव जिल्हा

दुर्दैवी! नशिराबाद नगरपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । शेताजवळ गटारीचे काम करत असतांना विजेच्या वायरचा धक्का लागल्याने नगरपंचायतीमधील तरुण साफसाफई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडलीय. ही घटना जळगाव तालुक्याची नशिराबाद येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नशिराबाद येथे वास्तव्यास असलेला विशाल गोपी चिरावंडे (वय-२६) हा नशिराबाद नगरपंचायतीत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. नेहमीप्रमाणे विशाल चिरावंडे हा मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता नशिराबाद गावजवळील शेताजवळ गटारीचे काम करत असतांना त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरीकांच्या लक्षात आल्याने त्याला उचलून खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्याला मयत घोषीत केले.

यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरूणाच्या पश्चात आई सुनिता, तीन भाऊ , पत्नी नैना, तर सोनी व काजल या दोन मुली असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button