⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

भुसावळचा आणखी एक गुन्हेगार स्थानबध्द ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर एमपीडीए (MPDA) अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करत मुंबई मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे (वय-२९, रा. हनुमान नगर भुसावळ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून गंभीर गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जात आहे. भुसावळ शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत.

हा धोकादायक गुन्हेगार असल्याचा प्रस्ताव भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांनी प्रस्ताव तयार केला होता, हा प्रस्ताव त्यांनी ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला सादर केला. त्यानुसार या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुन्हेगार चेतन खडसे याला मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे.