Gold Silver Price : या आठवड्यात सोने-चांदीने राबवली दरवाढीची मोहिम, आताचा काय आहे भाव?

ऑगस्ट 26, 2023 10:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२३ । अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदरात वाढीचा निर्णय घेतला असून याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर दिसून आला. या आठवड्यात सोने-चांदीने (Gold Silver Price) दरवाढीची मोहिम राबवली. असं असले तरी सोने दीड ते दोन महिन्याच्या नीच्चांकीवर आहे. यापूर्वी एप्रिलनंतर जुलै महिन्यात सोन्याच्या किमतीने मोठा डोंगर गाठला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आली.

gold silver 2 jpg webp

दरवाढीला लागला ब्रेक
मे आणि जून महिन्यानंतर ऑगस्टमध्ये पण सोने-चांदीचे आक्रमण थोपविण्यात आले होते. दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नव्हती. पण महिन्याच्या अखेरीस या आठवड्यात सोन्याने दबाव झुगारला. किंमतीत मोठी वाढ झाली. ही वाढ सतत सुरु होती. त्यानंतर शेवटच्या दिवशी किंमती किंचित घसरल्या.

काय आहे सोन्याचा भाव ?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमतींनुसार 24 कॅरेट सोने 58,720 रुपये, 23 कॅरेट 58,485 रुपये, 22 कॅरेट सोने 53,788 रुपये, 18 कॅरेट 44040 रुपये, 14 कॅरेट सोने 34,351 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 73,695 रुपये होता.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54,200 रुपयावर गेला आहे. तर दुसरीकडे 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59,100 रुपायांवर आहे. त्याचप्रमाणे एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 74,000 रुपयांवर गेला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now