⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सोन्याने घेतली पुन्हा भरारी ; चांदीनेही गाठला मोठा टप्पा, आजचा दर तपासून घ्या

सोन्याने घेतली पुन्हा भरारी ; चांदीनेही गाठला मोठा टप्पा, आजचा दर तपासून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । जागतिक बाजारात सोन्याने (Gold Rate) पुन्हा भरारी घेतली असून यामुळे आज गुरुवारी सोने दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सोन्यात सातत्याने पडझड झाली असताना चांदी पुन्हा एकदा उसळी घेताना दिसत आहे. चांदीने (Silver Rate) सोन्यापेक्षा सरस कामगिरी बजावली. गेल्या काही दिवसापूर्वी ७० हजारांवर आलेला चांदीचा दर आता पुन्हा ७३ हजारावर गेला आहे. Gold Silver Rate Today

जागतिक घडामोडीचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला. दोन्ही धातूंनी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मे आणि जून महिन्यात त्याला मोठी झेप घेता आली नाही. तर जुलै महिन्यात किंमती वधारल्या होत्या. या महिन्यात पण दोन्ही धातूंना विशेष कामगिरी बजावता आलेली नाही.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर
आज गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असताना देशांतर्गत सोन्याच्या फ्युचर्समध्येही सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली. गुरुवारी मौल्यवान धातूच्या फ्युचर्सचे लाल रंगात म्हणजे घसरणीसह व्यवहार करत आहेत. MCX वर दरवाढीचे चक्र तोडून सोने आणि चांदीच्या फ्युचर्समध्ये घसरण होत आहे. गुरुवारी सोन्याचे वायदे प्रति १० ग्रॅम ४५ रुपये घसरणीसह ५८ हजार ७७४ रुपयांवर आले, तर सप्टेंबर चांदीचे वायदे २५३ रुपये कमी होऊन ७३ हजार ७५१ रुपये प्रति किलो ग्रॅमवर व्यवहार करत आहेत.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी ५४,२०० रुपयावर गेला होता. तर दुसरीकडे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६०,००० रुपायांवर गेला आहे. त्याचप्रमाणे एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ७४,००० रुपयांवर गेला आहे. दोन दिवसापूर्वी चांदीचा दर ७२ हजारांवर होता. त्यात तब्बल २००० ते २२०० रुपयापर्यंतची वाढ झालेली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.