जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२३ । जुलै महिन्यात जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाने नद्या नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. या झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या मात्र जिल्ह्यात अद्यापही काही धरणामध्ये इंचभरही वाढ झालेली नाहीय. तर काही धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे जलसंकट येण्याची स्थिती निर्माण झाली
पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले तरी यंदा जिल्ह्यातील अनेक धरणांतील जलसाठ्यात वाढ झालेली नाहीय. जिल्ह्यात मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी जलसाठा आहे. गतवर्षी जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये 70 पेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा 40 ते 42 टक्क्यांवर आहे.
आता उर्वरित पावसाळ्याच्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर पुढच्या काळात पिण्याच्या पाण्यासह शेतकरी, उद्योगांवर जलसंकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या संपूर्ण राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. पावसाने विश्रांती घेतली असून पिकांनी देखील माना खाली टाकल्या आहे. यामुळे पाऊस कधी पडेल ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
यात जिल्ह्यातील धरणांमध्ये वाढण्याऐवजी जलसाठा कमी होत चाललं आहे. यामुळे जलसंकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात देखील गतवर्षीपेक्षा कमी जलसाठा आहे. गेल्या वर्षी यावेळी गिरणा धरणात 92.33 टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र 37.35 टक्के जलसाठा आहे.
जिल्ह्यातील या धरणांनी गाठला तळ?
अग्नावती (00 टक्के जलसाठा शिल्लक)
हिवरा (00 टक्के जलसाठा शिल्लक)
भोकरबारी (2.26 टक्के जलसाठा शिल्लक)
मन्याड ( 4.92 टक्के जलसाठा शिल्लक)
मोठ्या धरणांमधील सध्या स्थितीचा जलसाठा?
हतनूर (32.39 टक्के जलसाठा शिल्लक)
गिरणा (37.35 टक्के जलसाठा शिल्लक)
वाघूर (56.30 टक्के जलसाठा शिल्लक)
मध्यम धरणांमधील सध्या स्थितीचा जलसाठा?
अभोरा (100 टक्के जलसाठा शिल्लक)
मंगरूळ (100 टक्के जलसाठा शिल्लक)
सुकी (100 टक्के जलसाठा शिल्लक)
मोर (65.77 टक्के जलसाठा शिल्लक)
तोंडापूर (46.72 टक्के जलसाठा शिल्लक)
अंजनी (55.06 टक्के जलसाठा शिल्लक)
गूळ (64.43 टक्के जलसाठा शिल्लक)
बोरी (12.30 टक्के जलसाठा शिल्लक)