RBI कडून रेपो दर जाहीर ; तुमच्या कर्जाचा EMI वाढला की कमी झाला? जाणून घ्या..

ऑगस्ट 10, 2023 12:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२३ । तुम्ही जर होम लोन किंवा कार लोन घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या होम लोनची EMI आधीच चालू असली तरी ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 44 व्या चलनविषयक धोरण आढावा बैठकीत (MPC मीटिंग) रेपो दर जाहीर केला आहे. यावेळी RBI ने रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय. यामुळे कर्जाचा EMI भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल, जून आणि आता ऑगस्टमध्ये सलग तिस-यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दर जुन्या पातळीवर ठेवला आहे. जूनमध्ये आरबीआयने रेपो दर ६.५ टक्के याच पातळीवर कायम ठेवला होता.

RBI Repo Rate jpg webp

रेपो दर 6.5 टक्क्यावर कायम
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज गुरुवारी एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सलग तिसऱ्यांदा रेपो दर सर्वसहमतीने ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. याआधी वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात अडीच टक्क्यांनी वाढ केली होती. रेपो दरातील हा बदल मे 2022 ते मार्च 2023 या कालावधीत करण्यात आला. गेल्या वर्षी मे २०२२ पर्यंत रेपो दर ४ टक्के होता. मात्र सध्या त्याचा दर ६.५ टक्के आहे.

EMI वर परिणाम होत नाही
आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच रेपो दर जुन्याच पातळीवर कायम आहे. यामध्ये कोणताही बदल न केल्यामुळे तुमचा EMI देखील जुन्या स्तरावरच राहील. मात्र, आगामी काळात बँकांकडून एफडीच्या व्याजदरात कपात केली जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगूया की रेपो दर सध्या गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च पातळीवर चालू आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी व्याजदरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू केली. यानंतर महागाई दरात घट दिसून आली.

कोणाला दिलासा मिळणार?
बँकेकडून कर्ज घेण्याची योजना आखत असलेल्या ग्राहकांना रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता फायदा मिळेल. सध्या बँकांकडून कोणत्याही प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली जाणार नाही. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास त्याचा परिणाम ग्राहकांना मिळणाऱ्या कर्जावर होईल.

रेपो दर म्हणजे काय?
RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना आरबीआयकडून महागड्या दराने कर्ज मिळेल. यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादींचे व्याजदर वाढतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now