जळगाव जिल्हा

आनंदाची बातमी! देवळाली-भुसावल शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२३ । चाळीसगाव ,पाचोरा ते जळगाव दरम्यान नियमित ये -जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी देवळाली भुसावल एक्सप्रेस (शटल) (Devalali Bhusawal Train) लवकरच पूर्वनिर्धारित वेळेनुसार सुरू करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे -पाटील (Raosaheb Danve-Patil) यांनी दिल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील भाजपा अध्यक्ष अमोल शिंदे (Amol Shinde) यांच्यासह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री नामदार रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन अनिल कुमार लाहोटी यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी देवळाली भुसावळ शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावेल असे आश्वासन मंत्री दानवे पाटील, चेअरमन लाहोटी यांनी भेटीदरम्यान दोन्ही मान्यवरांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

शटल रेल्वे पूर्वनिर्धारित वेळेनुसारच – प्रवाश्यांमध्ये आनंद
खान्देशातील प्रवाशांच्या सोयीची शटल रेल्वे सेवा म्हणजेच देवळाली भुसावल एक्सप्रेसच्या वेळेत कोरोना काळात बदल झाला होता. परिणामी मनमाड ते भुसावल दरम्यान दररोज ये-जा करणारे प्रवासी, नोकरदार व चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा भाजपा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांचे सह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य तथा प्रवासी परिषदेचे जनरल सेक्रेटरी प्रभू पाटील, सल्लागार सदस्य गिरीश बर्वे , अनिल चांदवानी, राजेंद्र बडगुजर, निलेश कोटेचा यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री नामदार रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन माननीय अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली.

या भेटीत देवळाली भुसावल शटलच्या मागणीबाबत लोकसभेचे अधिवेशन संपल्यावर लगेचच होणाऱ्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले. यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळी निवेदने मान्यवरांना देण्यात आली, या निवेदनावर उपरोक्त उपस्थित सदस्यांसह हिरालाल चौधरी, ॲड. प्रशांत नागणे, प्रदीपकुमार संचेती, राजू धनराळे व प्रमोद सोमवंशी यांच्यासह अनेक प्रवाश्यांच्या स्वाक्षरी आहेत.

पी जे रेल्वे नंतर पुन्हा खासदारांची खंबीर आग्रही भूमिका
या दिल्ली भेटीत दोन्ही मान्यवरांनी शटल रेल्वेची आवश्यकता व उपयोगिता जाणून घेतली. शटलच्या पूर्वनिर्धारित वेळेला पर्याय म्हणून अजंता एक्सप्रेस मनमाड ऐवजी भुसावळ पासून सुरू करण्याबाबत आणि धुळे ते चाळीसगाव मेमो रेल्वे सेवा जळगाव पर्यंत वाढविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच अक्कलकोट, तुळजापूर व पंढरपूरला जाणाऱ्या खानदेशातील भाविकांसाठी साप्ताहिक धावणाऱ्या यशवंतपुरम- अहमदाबाद एक्सप्रेसला पाचोरा व चाळीसगाव येथे थांबा देण्यात यावा अशी करीत खासदार उन्मेश पाटील यांनी खंबीर आग्रही भूमिका मांडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button