जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ । मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि कालीपिली जीपचा भीषण अपघात झाला. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने कालीपिली जीपला जोरदार धडक दिली. या अपघतात अपघातात 6 जण ठार झाले असून त्यात यावल तालुक्यातील न्हावी येथील युवकाचा समावेश आहे.प्रज्वल शंकर फिरके ( वय २८) असं या मृत तरुणाचं नाव आहे.
या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू तर २ प्रवाशांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू (Accident) झाला. तर ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, या अपघातातील मृतांमध्ये यावल तालुक्यातील न्हावी येथील तरुणाचा समावेश आहे. प्रज्वल फिरके हा सध्या मुंबई येथे वास्तव्यास होता. आज सकाळी त्याच्या मृत्यूची माहिती येताच परिसरावर शोककळा पसरली आहे.