जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । संपुर्ण राज्याचे राजकारण सध्या तापले आहे. कारण अजित पवार यांनी खुले बंङ केले असुन पक्षावर दावा सांगीतला आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.यामुळे राज्यात आणखी एक बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांनी सोनिया-राहुल गांधींची भेट घेतली असल्याच्या चर्चा आहेत.
पंकजा मुंडे भाजपमधील ओ.बी.सींचा मोठा चेहेरा आहेत. त्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. मात्र पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असुन त्या नाराज आहेत असे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा आपली वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे.
पंकजांनी दोनवेळा दिल्लीत जाऊन काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली. असे म्हटले जात आहे. पंकजा मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशासंबंधीची मला कोणतीही माहिती नाही. पण पंकजाताई काँग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहे.