सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.40 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.य़ावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
‘मी काल माझी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन ते अडीच वर्ष जे काही राजकारण सुरू आहे. ते दिवसेंदिवस किळसवाणं होतं आहे. आमच्या नेत्यांना मतदारांशी काहीही घेणदेण नाही. मला असं वाटतय की, नागरिकांनी सगळ्यांचा वीचार करणे गरजेचे आहे.
तर मी थोड्याच दिवसात मेळावा घेऊन याबाबत बोलणार आहे’ तीथे मी बोलिनच. तर ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते असा निर्णय घेतील हे पटतं नाही, पवार साहेब काही म्हणत असले की माझा या घटनेशी काही संबध नाही तरीदेखील हे मोठे नेते पाठवल्याशिवाय जाणार नाहीत, उद्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तरीदेखील मला आश्चर्य वाटणार नाही’ असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.