⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

आकड्यांमध्ये गिरीश महाजन गोंधळले : अजित पवारांनी फटकारले

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२२ । विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारा नंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. अशावेळी विविध प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येत आहेत. मात्र हेच प्रस्ताव पटलावर ठेवताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन प्रस्तावाचा अनुक्रम विसरले. किंबहुना प्रस्ताव ठेवताना अनुक्रमाबाबत गिरीश महाजन यांचा गोंधळ उडाला. ज्यामुळे त्यांना अजित पवारांनी फटकारले. (Ajit pawar angry on girish mahajan)

तर झाले असे की, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेपुढे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला विरोधकांनी विरोध केला तर सत्ताधारी पक्षांनी समर्थन दिले. आवाजी मतदान घेण्यात आले होते. यावेळी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रस्तावाला मान्यता देत पुढील प्रस्ताव घेण्यात सांगितला. मात्र जो प्रस्ताव क्रमांक 17 होता त्याला गिरीश महाजन आणि प्रस्ताव क्रमांक 18 म्हटले. यामुळे विधानसभेमध्ये गदारोळ झाला. यावेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रस्ताव रेटून न नेता प्रस्ताव व्यवस्थित सादर करावा असे सांगितले. (bhaskar jadhav and rahul narvekar)

यानंतर या सर्व संभाषणामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांना फटकारले व सभागृहाच्या मान मर्यादा असतात. प्रस्ताव सादर करताना कोणाकडूनही काही चूक झाल्यास ती सुधारली जावी असे म्हणाले. आणि मंत्री म्हणून आपण कोणता प्रस्ताव सादर करत आहोत याचे भान मंत्र्यांनी ठेवले पाहिजे असे म्हणाले. याचबरोबर मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करताना गोंधळून जाऊ नये असे देखील अजित पवार म्हणाले.